सांगली, 3 ऑगस्ट : सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महापालिकेचा आज निकाल लागणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही महापालिकेच्या एकून 153 जागांसाठी 754 उमेदवारांचा आज फैसला लागणार आहे. या निवडणुकीत सरासरी अंदाजे 57 टक्के इतकं मतदान झालंय. यात सांगलीत महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील तर जळगावात सुरेशदादा जैन या दोन दादांची प्रतिष्ठापणाला लागलीये.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी 62 टक्के तर जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 जागांसाठी अंदाजे 55 टक्के मतदान झालंय. सांगलीत 11 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी, भाजप सह शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.आम्ही तुमच्यासाठी याच संकेतस्थळावर मतमोजणीचे Live Updates घेऊन येत आहोत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours