भंडारा जिल्हा संपादक शमीम आकबानी
आज दि.20-8-2018 राेजी सकाळी १०:३० वाजता भंडारा जिल्हा पाेलीस यांना आराेग्य विभाग मुंबई यांनी कळविले की एका अघ्यात ईसमाने फाेन करिन कळविले कि, जिल्हा रुग्णालय भंडारा येथे बॉंम्ब ठेवन्यात आला आहे.या माहितेचे पाेलिस अधिक्षक विनीता साहु यांनी गांभिर्य लक्षात घेताच एक क्षणाचाही विलंब न करता तत्काळ पाेलिस उपविभागीय अधिकारी जाेगदंड,व स्थानिक गुन्हे शाखेचे रविन्द्र मानकर ,आणि बॉंम्ब शाेधक व नाशक पथकाचे अधिकारी यांना माहिती दिली व सामान्य रुग्णां मधिल रुग्ण,व नातेवाईकांना काेणत्याही प्रकारचा सुगावा लागु न देता अंत्यत गाेपनीय पद्धतीने सामान्य रुग्णालय मधे आतील व बाहेरील परिसराची प्रत्येक वार्डाची ,आेपीडी,बाह्यरुग्ण तसेच पार्कींगचे ठीकाणाचे बॉंम्ब शाेधक व नाशक पथकातील श्वान व उपकरणांच्यां सहाय्याने संपुर्ण परिसर पिंगुन काढन्यात आला असता काेणतीही बॉंम्ब सदृश्य वस्तु किंवा इतर काेणतीही संशयास्पद वस्तु मिळाली नाही . ती माहिती पाेलिसांनी देऊन आराेग्य विभाग मुंबई येथे फाेन करणाऱ्या इसमाचा शाेध घेणेकामी उपविभागीय पाेलिस अधिकारी जाेगदंड यांनी त्यांचे एक पथक स्थानिक गुन्हे शाखेचे ५ पथक ,जिल्हा विशेष शाखेचे दाेन पथक,नक्षल सेलचे १पथक तयार करुन फाेन करनाऱ्या इसमाचा शाेध घेतला व फाेन करणारा ईसम नामे मिलींद राजु मेश्राम रा.खात जिल्हा नागपुर यास पाेलिसांनी अंत्यंत शिताफीने दिड तासात ताब्यात घेतले असुन त्याला विचारपुस केली असता त्याने सांगितले की,माझी आजी ४ दिवसांपासुन सामान्य रुग्णालय भंडारा येथे भर्ती असुन तिचे उपचार  बराेबर हाेत नसल्याने व काेनतीही वैद्यकिय अधिकारी व नर्सेस लक्ष देत नसल्यामुळे अश्या प्रकारचा फाेन केल्याचे सांगीतले आहे .सदर ईसमाविरुद्ध पुढिल कायदेशिर कार्यवाही पाेलिस स्टेशन भंडारा चे पाेलिस अधिकारी चव्हान हे करित आहेत 
भंडारा पाेलिसांनी अंत्यंत शिताफीने व तत्परतेने त्यास ताब्यात घेतल्याने पाेलिसांचा काैतुक करन्यात आला आहे 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours