मुंबई: देशातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबई. मुंबई महापालिकेचं बेजेट हे अनेक छोट्या राज्यांच्या बेजेट पेक्षा मोठं असंत. एक कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबई महापालिकेचा कारभारही तेवढाच अवाढव्य. एवढा प्रचंड मोठा विस्तार आणि शक्तिशाली असलेल्या महापालिकेचा कारभार तेवढ्याच सक्षमपणे सांभळणं आवश्यक असतं. मात्र मुंबई महापालिकेत किती सावळा गोंधळ आहे याचं उदाहरण आज समोर आहे. महापालिकेचे आयुक्त अजोय मेहेता यांचे माध्यम सल्लागार राम दुतोंडे यांच्याबद्दल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना काहीच माहिती नव्हतं. अशी काही नियुक्ती झाली आणि तिथे कुठला अधिकारी काम करतो याबाबत महापौर गेली दोन वर्ष अंधारात होते हे आज एका बैठकीत स्पष्ट झाल्यानं पालिकेतल्या सावळ्या गोंधळाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.

त्याचं असं झाली की, महापौरांनी आज बीएमसीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांना घ्याव्या लागत असलेल्या ऑनलाईन परवानगीचा विषय निघाला. ही तारिख वाढवण्यात आल्याची माहिती राम दुतोंडे यांनी वाट्सअप आणि ई-मेल वर पाठवल्याचं जेव्हा महापौरांना समजलं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. हे राम दुतोंडे कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी बैठकीत विचारला. तेव्हा त्यांना त्यांच्या पीए ने सांगितलं की राम दुतोंडे हे आयुक्तांचे माध्यम सल्लागार आहेत. तेव्हा तर महापौर आणखीच आश्चर्यचकीत झाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours