पुणे : पुणे पोलिसांनी ज्या पाच माओवादी समर्थक नेत्यांना अटक केली त्यांच्याकडून दोन पत्र जप्त करण्यात आली होती. त्या पत्रांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उघडकीस आला. त्याचबरोबर भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंगयांच्या हत्याचाही कटाचाही उल्लेख एका पत्रात आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. 2016 मध्ये माओवाद्यांनी पाठवलेल्या पत्रांमध्ये मोदी, शहा आणि सिंग यांच्या हत्या कटाची चर्चा आढळून आली. तर 2017 मधल्या एका पत्रात राजीव गांधींची हत्या ज्या प्रकारे बॉम्ब स्फोटाव्दारे करण्यात आली होती त्याच प्रकारे पंतप्रधान मोदींचीही हत्या घडवून आणता येवू शकते का याची चाचपणी माओवादी करत होते असा दावा पोलीसांनी केला आहे. दुसरं पत्र हे कॉम्रेड प्रकाश यांच्या नावावर असून ते पत्र रोना विल्सन यांच्या दिल्लीतल्या घरातून जप्त करण्यात आलं होतं. या धक्कादायक माहितीनंतर पोलिसांनी देशभर छापे घालून पाच माओादी समर्थकांना अटक केली होती. आज पुणे कोर्टात काही समर्थकांना पोलिसांनी हजर केलं आणि अत्यंत गंभीर पुरावे सादर केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours