वाशिम : भाबडं, पोळलेलं मन परमेश्वर नावाच्या शक्तीशी स्वत:ला जोडू पाहातं. आता सगळा भार त्याच्यावर असं म्हणून रोजच्या युद्धाला सज्ज होण्याची आमची मानसिकता आहे.  विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील वाशीम जिल्ह्यातल्या आडगावातल्या लोकांनीही देवाच्या भेटीसाठी धावा सुरु केलाय. शेतीत राम राहिला नाही असं म्हणतात पण देव नक्की दिसू लागलाय.

देवाचा धावा करणाऱ्या माणसांना देव कधी, कुठे आणि कसा भेटेल याचा नेम नाही. विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवरील वाशीम जिल्ह्यातल्या आडगावातल्या लोकांसाठी तो जमिनीतून अवतरलाय. यत्र-तत्र सर्वत्र ज्याचं अस्तित्व आहे अशा देवाचा धावा करणाऱ्या या माणसांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. त्याचं कारणही तसंच आहे...ऐन श्रावणी सोमवारी शेतात महादेवाची पिंड अवतरलीय.
शेतात अवतरेल्या या पिंडीत कुणाला महादेव... कुणाला पार्वती...कुणाला कासव दिसला तर काहीजणांना सापही...आता एकाच ठिकाणी एवढं सगळं दिसू लागल्यावर हा दैवी चमत्कार म्हणून खपला नसेल तरच नवल...
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours