शिर्डी : संगमनेर तालुक्यात आज पुन्हा एखदा भुकंपाचे हादरे बससल्यामुळे एकच खळबळ उडाली.  संगमनेर तालुक्यात घारगाव परीसरात भुकंपाचा धक्के जाणवले.  तीन दिवसांपूर्वीही याच गावात भुकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. आजही जोरदार धक्का बसल्याने नागरीक भयभित होऊन घराबाहेर आले आहे.
तिन दिवसांपूर्वी अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या घारगाव, बोरबन,कुरकुंडी,माहुली परिसर जोरदार या भूकंपामुळे हादरला.
संगमनेर तालुक्यातील घारगाव, आंबीखालसा, कुरकुंडी, बोरबन,माहुली, माळेगाव पठार आदी गावे या भूकंपाने चांगलीच हादरली होती. काही घरांमधील भांडी पडली तर घरांचे पत्रेही जोरदार हादरले. अचानक बसलेल्या हादऱ्यांनी लोकांनी थेट घराबाहेर पळ काढला काहींनी आरडा ओरडही केली. पण नेमकं काय झाले हे कोणाला समजत नव्हते या धक्कयांची तीव्रता इतकी जोरदार होती की इमारतीमधील लोकंही घराबाहेर पडले होते. ग्रामस्थांमध्ये अक्षरश: घबराटीचे वातावरण पसरले होते.
तहसीलदार साहेबराव सोनवणे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांना माहिती समजताच त्यांनी या गावांना भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली. ग्रामस्थांनी घाबरून न जाण्याचे आवाहनही त्यांनी केलंय.
पण आज तिसऱ्या दिवशी पुन्हा हादरा बसलामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागरिक भयभित झाले असून घराबाहेर पळ काढला.
दोन दिवसांपूर्वी 22 आॅगस्टला अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात सादरावाडी या गावात मंगळवारी रात्रीच्या दरम्यान दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिक चांगलेच घाबरले. सोमवारी रात्री आलेल्या भूकंपाच्या सौम्य धक्यामुळे प्राथमिक आरोग्य-केंद्राच्या इमारतीचा काही भागातील स्लॅब कोसळला.
15 दिवसापूर्वीही याच गावात भूकंपाचे सौम्य धक्के आले होते. सोमवारी या भूकंपाच्या वेळी धारणी येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी हे रात्रभर तळ ठोकून गावात हजर होते. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाच्या या घटनेला जिल्हाधिकारी यांनी दुजोरा दिला असून किती रिस्टर स्केलचे होते हे समजू शकले नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours