मुंबई, २५ ऑगस्ट- मुंबईतील पर्यटनवृद्धीसाठी आणलेली अॅम्पीबियस बस आणि रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्गामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी चांगलेच हतबल झालेत. 'रखडलेल्या चौपदरीकरणामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत, त्याची मंत्री म्हणून मला लाज वाटते. पण हे पाप काँग्रेस आघाडी सरकारचं आहे,' असं गडकरी म्हणालेत. दरम्यान यावर आता नव्याने कंत्रातदार नेमला असून तातडीने काम पूर्ण करण्याची तंबी दिल्याचही त्यांनी स्पष्ट केलं. सोबतच त्यांनी मुंबई - दिल्ली अंतर आणखी कमी व्हावं आणि व्यापारालाही चालना मिळावी यासाठी मुंबई- दिल्ली हा नवीन एक्सप्रेस-वे निर्माण करणार असल्याची घोषणा केली.
मुंबईतील पर्यटनवृद्धीसाठी आणलेली 'अॅम्पीबियस' बस आणि रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे गडकरी चांगलेच उद्विग्न झाल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. रखडलेल्या चौपदरीकरणामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. मंत्री म्हणून मलाच त्याची लाज वाटते आहे. मात्र, हे पाप काँग्रेस आघाडी सरकारचे आहे. नव्याने कंत्राटदार नेमला असून तातडीने काम पूर्ण करण्याची तंबी दिल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.
मुंबई दिल्लीमधील अंतर आणखी कमी व्हाव व व्यापाराला चालना मिळावी या साठी मुंबई दिल्ली हा नवीन एक्सप्रेस वे निर्माण करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. या एक्सप्रेस वेची निर्मिती करण्यासाठी तब्बल १ लाख कोटी रुपये खर्च येणार असून अडीच ते तीन वर्षात याच काम पूर्ण करण्याचा मानस आहे. या महामार्गामुळे मुंबई दिल्ली हे अंतर अवघ्या १२ तासात पार करणे शक्य होणार असून याचं काम डिसेंबरमध्ये सुरू करणार असल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली. यावेळी मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेल्या कामा बद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माफी मागितली असून हे पाप आमचं नाही तर मागील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचे असल्याच सांगत मार्च 2019 पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करणार असल्याची घोषणा केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours