रिपोर्टर... विलास सुदामे
वेळीच योग्य उपचारामुळे रूग्णाचा वाचला जिव प्रतिनिधी 
तक्रार करूनसुद्धा कारवाई शून्य
जिल्हा रुग्णालयात रुग्णच्या जीवाशी खेळ

भंडारा: जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांकडुन गरोदर महिलेवर चुकीच्या पध्दतीने उपचार करण्यात आल्याने सदर महिलेच्या जिवाला धोका निर्माण झाला.मात्र वेळीच त्या महिला रूग्णावर नागपूर येथील रूग्णालयात योग्य उपचार करण्यात आल्याने त्या महिलेचा जिव थोडक्यात वाचला.मात्र या सगळया प्रकारामुळे त्या महिलेच्या कुटूंबियांना मोठया प्रमाणात आर्थीक भुर्दंड बसला असुन महिलेवर चुकीचा उपचार करून तिच्या जिवास धोका निर्माण करणाºया जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांविरोधात कारवाई करण्यात यावे तसेच महिलेच्या उपचारावर झालेल्या संपुर्ण खर्चाची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी त्या महिला रूग्णाचा भाऊ मो.इमरोज खान यांनी भंडारा जिल्हा शल्य चिकित्सक व भंडारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
मो.इमरोज खान यांनी दिलेल्या निवेदनानुसार,त्यांची बहीण यास्मीन इरशाद शेख मु.रामटेक त.रामटेक जि.नागपूर यांची दि.३ जुन २०१८ रोजी सायं.६ ते ७ वाजेच्या दरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे सिझेरीयन प्रसुती करण्यात आली.मात्र अवघ्या एका तासानंतर सदर महिलेच्या शरीरातुन मोठया प्रमाणात रक्तस्त्राव होवु लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली.तेथील डॉक्टरांनी त्या महिला रूग्णाला लगेच पुन्हा आॅपरेशन थिएटरमध्ये नेले व एका तासांनी त्यांना अतिदक्षता विभागात नेण्यात आले.तिथे रात्रभर ठेवल्यानंतर दुसºया दिवशी सकाळी रूग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी यास्मीन यांना पुढील उपचाराकरीता नागपूर येथे नेण्यास सांगीतले.
यास्मीन यांना नागपूर येथील मेडीकल कॉलेज येथील डॉक्टरांनी तपासणी करून रूग्णाची प्रकृती खुपच खालावल्याचे सांगत रूग्णाच्या शरीरातुन मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्या किडणी व लिव्हरवर  परिणात झाल्याचे सांगीतले.तसेच रूग्णाचे जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांनी योग्य प्रकारे सिझर प्रसुती न केल्यामुळे रूग्णाच्या जिवाला धोका निर्माण झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगीतले.दरम्यान यास्म्मीन यांची प्रकृती आणखीनच खालावल्याने रूग्णालयातील किडनी विभागाशी संपर्क साधला असता चुकीच्या सिझर प्रसुतीमुळे रूग्णाच्या किडनीवर परिणाम झाल्याने रूग्णाची प्रकृती खालावल्याचे सांगत डॉक्टरांनी त्यांना सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल नागपूर येथे पाठविण्यात आले.
सुपर स्पेशालीटी रूग्णालयात रूग्णावर १ ते १० वेळा डायलेसीस करण्यात आले मात्र रूग्णाच्या प्रकृतीमध्ये काही एक सुधार दिसुन आला नाही.त्यामुळे डॉक्टरांनी रूग्णाची किडणी तपासणी चे रिपोर्ट मुंबई येथे पाठविण्याचे सुचित केले व त्याकरीता ७ हजार रूपये एवढा खर्च करण्यात आला.दरम्यान रूग्णांचे पुन्हा १ ते १० डायलेसिस करण्यात आले असे एकुण मिळुन रूग्णांचे २० वेळा डायलेसिस करून रूग्णाला परत मेडीकल येथे उपचाराकरीता पाठविण्यात आले.तिथे उपचार सुरू असतांना तेथील डॉक्टरांनी भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे रूग्णावर पुन्हा सर्जरी करण्याची आवश्यकता असल्याचे सांगीतले.
या सर्व प्रकारामुळे रूग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता मात्र वेळीच योग्य उपचार मिळाल्याने त्याचा थोडक्यात जीव वाचला.मात्र रूग्णांच्या नातेवाईकांना मोठा आर्थीक फटका बसला असुन त्यांना मोठया प्रमाणात आर्थीक व मानसिक त्रासाला सामोर जावे लागले.करीता चुकीचा उपचार करणाºया जिल्हा सामान्य रूग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई करून आर्थीक नुकसान ी पोटी जवळपास एक लाख ८० हजार रूपयाची आर्थीक नुकसान भरपाई देण्याची मागणी रूग्णाचा भाऊ मो.इमरोज खान यांनी  निवेदनातुन केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours