शहापूर : एकीकडे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील खड्डे बुजावल्याचा दावा करताय पण अवघा महाराष्ट्र खड्यात गेलाय. ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अनेक जण जखमी होत आहे. पण तरीही ढिम प्रशासनाला याचं सोयरसुतुक नाही. मुंबई - नाशिक महामार्गावर खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघात दोन बहिण भावांचा दुर्दैर्वी मृत्यू झालाय. तर आई वडील जखमी असून उपचार सुरू आहे.
शहापूर तालुक्यातील अवरे या गावातील प्रकाश बरकू घरत हा आपल्या पत्नीसोबत दोन मुलांना घेऊन रविवारी रात्रीच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरून बाईक वरून घरच्या दिशेने जात होते. ते रक्षाबंधन सणानिमित्त आसनगाव येथील आपल्या एका नातेवाईकांकडे गेले होते तेथून घरी परतत असताना मुंबई नाशिक-महामार्गावर पडलेले खड्डे चुकवत असतांना त्यांची बाईक खड्यात आदळून पडली आणि पती-पत्नी रस्त्याच्या बाजूला पडले तर दुचाकीवर बसलेली दोन मुले रस्त्यात पडली आणि त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या ट्रक बाईक आणि मुलाच्या अंगावरून गेल्याने यामध्ये दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला.
बरकू घरत (वडील), रेखा घरत (आई), असे जखमी झाले असून 10 वर्षांचा सचिन घरत आणि 15 वर्षांची मुलगी कामिनी यांचा जागीच मृत्यू झालाय. आई-वडिलांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहे.
स्थानिकांनी या घटनेचा संताप व्यक्त केलाय.त्यांच्या मते टोल वसुली करणाऱ्या कंपनीने रस्त्याची देखभाल केली पाहिजे तसंच प्रशासनाने देखील या खड्ड्यांवर लक्ष दिले पाहिजे. मात्र प्रशासन तसंच टोल वसुली करणारी कंपनी या दोघांचेही नाशिक मुंबई महामार्गवरील पडलेले जागोजागी खड्डे याकडे दुर्लक्ष आहे.
त्यामुळे या परिसरात प्रति दिवस एक ना एक दुर्घटना होतच असते. सध्या शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करीत अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours