मुंबई : महान क्रिकेकटपटू आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचं दीर्घ आजाराने बुधवारी रात्री मुंबईत निधन झालं. वाडेकर हे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरने आजारी होते. मुंबईतल्या जसलोक रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदा परदेशात कसोटी जिंकली आणि भारतीय क्रिकेट संघाला नवा हुरूप मिळाला.

1 एप्रिल 1941 मध्ये त्यांचा मुंबईत जन्म झाला. 1966 ते 1974 पर्यंत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द गाजवली. 1958 मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द सुरू केली. तर 1966 मध्ये आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलं. 1967 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला. 1972 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित वाडेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours