मुंबई- २८ जुलैला सकाळी १०.३० च्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३० जणांचा मृत्यू झाला होता. अपघातस्थळाच्या जागी क्रॅश बॅरिअर उभारणीसाठी खड्डे केल्याचे आढळले. मात्र क्रॅश बॅरिअरची उभारणी न झाल्याने वाहन चालकाच लक्ष विचलीत झाल्याचा अहवाल समोर आला आहे. तरीही अजून वाहनचालकाचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला नसून अहवालावरून चालक नशेत होता की नाही हे स्पष्ट होऊ शकले. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत दापोली कृषी विद्यापीठाचे ३१ पैकी ३० कर्मचारी मृत्यूमुखी पडले होते. प्रकाश सावंत देसाई हे एकमेव कृषी अधिकारी आश्चर्यकारक रित्या वाचले होते.
कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी १०.३० च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. आंबेनळी घाटात ही बस जवळपास ८०० फूट खोल दरीत कोसळली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours