■ पोलीस निरीक्षक ढोबळे यांचे प्रतिपादन ■
■ अड्याळ येथे अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम ■
प्रकाश हातेल
अड्याळ - अंधश्रध्दा हामानवी समाजाला मिळालेला एक शाप आहे अंधश्रध्दाळू माणूस आपली विचार सारशक्ती हरवून बसलेला असतो. बुबा,साधु महंत, महाराज यांचे कडून फसवल्या गेल्याच्या तरुण-तरुणीच्या शोाकांतिकेच्या दु:खत  वार्ता सतत आपल्या कानावर येतात तेव्हा लक्षात येतो कि,अजूनही आपल्या तथाकथित प्रगत समाज अंधश्रध्देच्या निबिड अंधारातच  चाचपडत आहे.या विज्ञान युगात हि श्रध्दाळू मंडळी बुवांच्या चमत्कारावर विश्वास ठेवतातच कसा हे काहि कळत नाही असल्यांचे प्रतीपादन अड्याळ येथील अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रमात पोलीस निरीक्षक एस.एम ढोबळे बोलत होते.
      फिरते पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस स्टेशन अड्याळ च्या वतीने गाडगेबाबा अंधश्रध्दा निर्मूलन समीती अमरावती यांचा अंधश्रध्दा निर्मूलन प्रबोधन कार्यक्रम गणेश सभागृह अड्याळ येथे घेण्यात आले.कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रबोधनकार श्रीकृष्ण धोडे कार्यक्रमाला पोलीस निरिक्षक एस एम ढोबळे,सरपंचा अड्याळ जयश्री कुंभलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
     पोलीस निरिक्षक पुढे म्हणाले  समाजाला वर्षानुवर्षे पोखरुन टाकणारी हि अंधश्रध्देची व्याधी नष्ट करावयाची असेल तर समाजीक प्रबोधनाची नितांत गरज आहे.किशोरीन मुलींनी घाबरू नका ,लाजू नका ,निर्भयपणे बोला,घरी शाळेत अथवा इतर ठिकाणी तुम्हाला आमिष दाखवून अथवा भिती दाखवून कुणी तुमचे लैंगीक शोषण करतो का ,लैंगिक सबंधासाठि कुणी जबरदस्ती करतो का आदी अत्याचार सहन करू नका शाॉ बसु नका ,लैंगिकशोषणाला बळी पडू नका निर्भया सारखी निरभय बना आपल्या पालकांना किंवा पोलिसांना माहिती द्या म्हणाले. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्रीकृष्ण धोडे यांनी बुवा बाजीवर व चमत्कारावर विश्वास ठेवून अंधश्रध्देला खतपाणी घालू नका महाराष्ट्र शासनाने जादुटोना विरोधी जारी केलेल्या कलमांची उपस्थितांना माहिती दिली तर चमत्कार करुन कशी फसवणूक करतात ते प्रात्याक्षिकांची व्दारे सादरीकरन करून लबाड बुवा बाजीचा फंडा फोड केला.
     कार्यक्रमाला पोलीस स्टैशन अड्याळ हद्दीतील सरपं, ग्राम सेवक,महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष,पोलिस पाटील, आशा वर्कर,ग्राम सुरक्षा दल,महिला बचत गट,महिला सुरक्षा समिती,पोलीस मित्र व विद्यार्थी व गावातील गणमान्य प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours