बुलढाणा, 16 सप्टेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या कोलोरी गावात चार वर्षीय चिमुकलीवर तिच्याच आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका लैंगिक अत्याचाऱ्याच्या घटनेतून बुलढाणा जिल्हा सावरतो न सावरतो तोच लैंगिक अत्याचाराची दुसरी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठी संतापाची लाट निर्माण झाली असून नेमकं बुलढाणा जिल्ह्यात चाललंय तरी काय ? असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.

घरी कोणी नसल्याचं पाहून या नराधम म्हाताऱ्याने या चिमुकलीवर अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना तशी चार तारखेची असून बदनामीच्या भीतीपोटी हा संपूर्ण प्रकार कुटुंबीय लपवत होते मात्र या चिमुकलीला तीव्र वेदना होत असल्याने तिला रुग्णालयात न्यावं लागलं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून या नराधम देविदास इंगळे विरुद्ध बलात्कार आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर पीडित चिमुकलीवर जवलच्या स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहे. तर पोलीस आता या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

बाप-लेकीच्या आणि आजोबा-नातीच्या पवित्र बंधनाला काळीमा फासणारी ही घटना आहे. या सगळ्या प्रकामारामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours