मुंबई, 16 सप्टेंबर : मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप स्लो लाईनवर दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर या वेळेत सीएसएमटी लोकल थांबणार नाहीत. पनवेल ते सीएसएमटी मार्गावरही वाहतूकही काही काळ बंद राहील, तर पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते भाईंदरमध्ये सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अप आणि डाऊन स्लो लाईनवर ब्लॉक घेण्यात येईल.
असं आहे वेळापत्रक
मध्य रेल्वे
- मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप स्लो मार्गावर ब्लॉक
- स. 10.37 ते दु. 4.02 पर्यंत मेगाब्लॉक
- स्लो लोकल फास्ट मार्गावर वळवणार
- नाहूर, कांजुरमार्ग, विद्याविहार स्थानकावर लोकल थांबणार नाही
हार्बर रेल्वे
- पनवेल-वाशी मार्गावर मेगाब्लॉक
- स. 11.06 ते दु. 4.34 पर्यंत दोन्ही मार्गांवर ब्लॉक
- या वेळेत पनवेलहून एकही लोकल सुटणार नाही
- वाशी-सीएसएमटी वाहतूक सुरू राहणार
- पनवेल-अंधेरी, पनवेल-ठाणे लोकलही रद्द
पश्चिम रेल्वे
- बोरिवली ते भाईंदर दरम्यान जम्बोब्लॉक
- स. 11 ते दु. 3 दरम्यान दोन्ही स्लो मार्गांवर डागडुजीचं काम
- स्लो मार्गावरच्या लोकल फास्ट ट्रॅकवर वळवणार
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours