मुंबई : मुंबईत गणेश विसर्जनाच्या दरम्यान तब्बल 5 लाख रुपयांचे मोबाईल चोरी करण्याचा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. मुंबई रेल्वेच्या जीआरपी टीमने मोबाईल चोरांची टोळी जेरबंद केलीये. हे चोर दिल्लीहुन मुंबईत आले होते. जीआरपी टीमने मोबाईल चोरांच्या गँगमधील दोघांना अटक केलीये.

गणेश विसर्जनासाठी गिरगाव, लालबाग, परळ भागात मोठ्या प्रमाणावर गणेशभक्तांनी गर्दी केली होती. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांसह मुंबईकरही यात सहभागी झाले होते. मात्र, या गर्दीचा फायदा घेत भुरटे चोर सहभागी झाले होते. चिंचपोकळी रेल्वे स्टेशनवर चोराने  एका प्रवाशाचा मोबाईल चोरून पळ काढला होता. पण त्या प्रवाशाने पाठलाग करून त्याला पकडले आणि जीआरपी पोलिसांच्या हवाली केलं. हरिषकुमार अमरसिंह असं या चोराचं नाव आहे. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा त्याने सगळी हकिकत सांगितली.

आरोपी हरिषकुमारच्या सांगण्यावरून दोन टाकी परिसरात एका लाॅजवर त्याचे सहकारी हे दिल्लीवरून आले होते. अटक झालेल्या सोनू राम रामकिशन शर्मा असं या या दुसऱ्या आरोपीचं नाव आहे. या लॉजमधून पोलिसांनी तब्बल 5 लाखांचे मोबाईल जप्त केले.

हे दोघेच नाहीतर या यांची पाच जणांची गँग होती. सर्वजण हे दिल्लीतून इथं चोरी करण्यासाठी आले होते. गणेश विसर्जनाच्या ठीक एकादिवसाआधी ते मुंबईत पोहोचले होते.

या गँगची मोबाईल चोरी करण्याची मोंडस आॅपरेंडी होती. या गँगचा एक सदस्य हा लोकलच्या दारात उभा राहतो. तो तिथे गर्दी झाल्याचं नाटक करतो आणि जेव्हा प्रवाशांची गर्दी होते तेव्हा त्याचे दोन सहकारी गर्दीतून प्रवाशांचे मोबाईल चोरी करायचे. चोरी केल्यानंतर आणखी दोन जण त्यांच्या मागे उभे असायचे. कुणी पकडलं तर त्यांच्याकडे चोरीचे मोबाईल दिले जायचे.

मुंबईतील दादर, चिंचपोकली स्टेशनवर या गँगने 23 सप्टेंबरच्या दिवशी 21 महागडे मोबाईल चोरी केले होते. पकडलेल्या चोरामध्ये एक आरोपी हा टॅक्सी ड्रायव्हर आहे तर दुसरा बेरोजगार आहे.

गणेश विसर्जनासाठी 50 सुरक्षा दल आणि पोलिसांचा पहारा होता. तसंच 5 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती. पण तरीही अनेक भागात चेन स्नेचिंग, पाकिट मारणे आणि 500 मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्यात.

जप्त केलेल्या मोबाईल फोनमध्ये आयफोनसह अन्य महाग फोन आहे. पोलीस आता या गँगच्या इतर तीन सदस्यांचा शोध घेत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours