(लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी अमर भालचंद्र  वासनिक यांचा आरोप)
जिल्हा संपादक शमीम आकबानी
भंडारा-----
भंडारा जिल्ह्यातील रेती घाटाची मुदत सम्पल्यानंतरही मोठ्या प्रमाणात अवैधपणे रेतीचे उत्खनन व वाहतूक होत आहे. भंडारा तालुक्यातील वैनगंगा नदी च्या घाटामधून सर्रास रात्रंदिवस अवैधपणे उत्खनन सुरू आहे. रेती माफियांशी साटेलोटे ठेऊन महसूल अधिकारी मालामाल होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी अमर भालचंद्र वासनिक यांनी केली आहे.
------ जिल्ह्यातील रेती उत्खनन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे.  घाट लिलाव धारक सुद्धा नियमाला फाटा देत क्षेत्राबाहेर जाऊन अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत वर्षभर उत्खनन करीत असतानाही महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी मात्र थातूर मातूर दोन चार ट्रॅक्टर, ट्रक सारख्या वाहनावर कार्यवाही करून मोठी रक्कम घेऊन सोडत आहेत. जिल्ह्यातील घाटाची मुदत ही संपल्यानंतरही नवीन घाटाचा लिलाव अजूनपर्यंत झालेला नाही. तरीसुद्धा वैनगंगा नदीच्या घाटामधून सर्रास रात्रंदिवस अवैधरित्या उत्खनन सुरू आहे . जेसीबी मशीन लावून आतापर्यंत हजारो ब्रास रेतीचा अवैधरित्या उपसा करण्यात आल्यामुळे करोडो रुपयांचा चुना रेती माफियांनी लावलेला आहे. नदी पात्रात रात्रंदिवस जेसीबी मशिनद्वारे उत्खनन होत असतानाही तलाठी व मंडळ अधिकारी या प्रकारापासून अनभिज्ञ कसे...? रेती माफियांना भंडारा तहसील चे तहसीलदार यांना हाताशी धरून दररोज लाखोंची उलाढाल करून शासनाच्या हातावर तुरी ठेवण्याचे काम करीत आहे....? 
-----तहसीलदार यांचे रेती माफियांशी घनिष्ठ संबंध असल्यानेच भंडारा महसूल विभागाचे अधिकारी रेतीचा साठा करण्यात मोठी मदद करतात. आणि थातूर मातूर लिलावाचे सोंग दाखवून मोठी रक्कम घेतात. व साठा जप्त न करताच त्याच साठ्याबरोबर नदीपात्रातील सर्रास रेती दिवसाढवळ्या मशिनद्वारे भरतात व दिवसाचे जवळपास २०० ते २५० ट्रक भरून प्रति दिवसाचे १५ लाख रुपयांची रेती नागपूरला विकल्या जात असल्याचा आरोप लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी अमर भालचंद्र वासनिक यांनी केला आहे. भंडारा जिल्ह्यामधून दररोज २०० ते २५० ट्रक रेती नागपूरला जात आहे. यामध्ये संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी गुंतले असल्याचा स्पष्ट आरोप लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेने केला आहे. महाराष्ट्र शासनाने वेळेवर रेती घाट लिलाव केले असते तर अशा प्रकारचा अवैध उत्खननामुळे शासनाचा करोडो रुपयाचा चुराडा झाला नसता. या प्रकरणाची शासन स्तरावर त्वरित उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देऊन मौकास्थळी सदर घाटावर आमच्यासमोर पंचनामा करावे. तसेच चौकशी होईपर्यंत सदर घाट क्षेत्रातील तलाठी मंडळ अधिकारी तसेच भंडारा तहसील ऑफिस मधील तहसीलदार यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेचे शहर प्रतिनिधी अमर भालचंद्र वासनिक यांनी केली आहे. 
          जर संबंधित दोषी अधीकारी तसेच संबंधित तलाठी तसेच संबंधित मंडळ अधिकारी यांच्यावर १५ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेतर्फे जिल्ह्यात तीव्र तसेच उग्र आंदोलन घेण्यात येईल . करिता सदर प्रकरणी योग्य चौकशी करून पुढील कार्यवाही करण्यात यावी अशी लोकशक्ती भ्रष्टाचार विरोधी सामाजिक संघटनेची मागणी आहे।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours