सिंधुदुर्ग : वेंगुर्ले तालुक्यातील्या ग्रामीण भागातील एका शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीशी त्याच शाळेतील शिक्षकाने संगणक खोलीत नेऊन अश्लील चाळे केल्याची घटना गुरुवारी (२७ सप्टेंबर) रोजी सायकाळी शाळा सुरु असताना घडली. शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना असून याबाबत संबंधित शिक्षक मूळ रहिवासी कुडाळ निरुखे तेरसेवाडी येथील जयप्रकाश दत्ताराम तेरसे याला या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील या शाळेत दोन शिक्षक असलेल्या शाळेतील एक शिक्षक गुरुवारी ट्रेनिंग साठी गेले होते. त्यावेळी शिक्षक तेरसे यांनी सायंकाळी त्या विद्यार्थिनीला संगणक कक्षात बोलावून घेतले आणि तिच्याशी अश्लील चाळे केले. यानंतर घाबरलेल्या त्या मुलीने शिक्षकाच्या तावडीतून कशीबशी सुटका करत घर गाठले. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी तिने शाळेत जाण्यास नकार दिला. शाळेत का जात नाही याबाबत तिच्या आईने तिला विचारले असता, तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.

याबाबत आईने तिच्या वडिलांना कल्पना दिल्यानंतर हा सर्व प्रकार त्या शाळेतील शिक्षण समिती अध्यक्षाच्या कानावर घालण्यात आला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेकडे धाव घेतली. मात्र त्याठिकाणी तेरसे शिक्षक उपस्थित नव्हता. यानंतर हा सर्व विषय वेंगुर्ला पचायत समितीचे सभापती सुनील मोरजकर यांच्या कानावर ग्रामस्थांनी घातल्यानंतर सभापती यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विषय जाणून घेत वेंगुर्ले पोलिसांना याबाबत खबर दिली. सायंकाळी वेंगुर्ले पोलिसांनी शिरोडा येथे जाऊन शिक्षकाला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

या शिक्षकाने यापूर्वीही दोडामार्ग येथे असे अनेक प्रकार केले असल्याची चर्चा आहे. बालकांवर लैगिक अपराधापासून सरक्षण अधिनियम 2012 च्या विविध कलम 8,10,12 व भा द वी कलम 354, अ (1 )(1) (4)  अन्वये गुन्हा दाखल दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकाच्या पोलीस ऊप निरीक्षक आर डी गोरड अधिक तपास करीत आहेत
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours