शिर्डी, 29 सप्टेंबर - दूधाचे दर कमी करण्याचा दुध संघाचा विचार असून, संघ आणि सरकारच्या भांडणात आमचं नुकसान होता कामा नये. मात्र, जर संघांने दुधाचे दर कमी केलेच, तर मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी दिलाय. एवढंच नव्हे, तर मंत्र्यांना नागडं करून मारण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अहमदनगर जिल्हयातील अकोले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस व दुध परिषद संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.

दरवर्षी जयसिंगपूर येथे घेतली जाणारी ऊस परिषद यंदा अकोले येथे पार पडली. राजू शेट्टी यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेला ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांच्यासह राज्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ज्ञानेश्वर महाराजांनी जसे रेड्याच्या तोंडातून वेध वदवून घेतले आणि त्याच्या पाठीवर थाप टाकली, तशीच थाप मारण्याची आज गरज असून त्यासाठी शेतकऱ्यांच्या पोरांना ज्ञानेश्वर महाराजांसारखे व्हावे लागेल असे शेट्टी म्हणाले. माजलेल्या रेड्यांना थाप टाकल्या शिवाय ते बोलणार नाहीत असा टोलाही त्यांनी कारखानदार लॉबीला लगावला.

राफेलची जबाबदारी मोदी नाकारू शकत नाहीत. स्वच्छ चारित्र्य असणाऱ्या मनोहर परिकर सारख्या माणसाची अडचण झाल्यानं त्यांना परत गोव्याला पाठवलं आणि सीतारामन यांना कुवती पेक्ष्या मोठी जबाबदारी दिली यातच मोठं काळबेरं लपलेलं असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी मोदींवर केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours