मुंबई, 08 जानेवारी : नालासोपाऱ्यामध्ये एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आलेल्या व्हॅनवर हल्ला करून 38 लाखांची रोकड लुटल्याची घटना घडली आहे. 
गौरीपाडा येथील संतोष भुवन येथे आज संध्याकाळी एक्सिस बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी रायटर सेफ गार्ड कंपनीची गाडी पोहोचली होती. गाडीतून पैसे उतरवत असताना अचानक 3 अज्ञात इसम तिथे आले आणि त्यांनी सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण करून तिघांनी गाडीतील 38 लाखांची रोकड घेऊन पळ काढला. या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झाला आहे. यावेळी हवेत फायर केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, कुणालाही गोळी लागली नसल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितलं आहे. तुळींज पोलीस आणि वालीव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours