मुंबई, 08 जानेवारी : अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये परदेशी महिलेवर वेटरने चाकू हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेनं वेटरला काही तरी आणण्याचं सांगितलं होतं, त्यामुळे या वेटरने या महिलेच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला.
मुंबईतील जेबीनगर भागातील कोशिया सुइट्स हाॅटेलमध्ये ही घटना घडली आहे. निशांत गौडा असं या वेटरचं नाव आहे. 5 जानेवारी रोजी संध्याकाळी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ही परदेशी महिला हाॅटेलमध्ये आली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला हाॅटेलमधील 204 क्रमांकाच्या रूममध्ये थांबली होती. तेव्हा या महिलेनं वेटर निशांतला काही तरी आणण्यास सांगितलं होतं. आधी तिने प्लेट आणण्यास सांगितलं, त्यानंतर पाण्याची बाटली आणि केक कापण्यासाठी चाकू आणण्यास सांगितलं होतं. तिने वारंवार केलेल्या मागणीमुळे वैतागलेल्या निशांतने त्याच चाकूने महिलेवर हल्ला केला होता. 
पोलिसांनी या वेटरला ताब्यात घेतलं असून पुढील तपास करत आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours