मुंबई, 08 जानेवारी : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पुन्हा एकदा मोदी सरकारला फटकारले आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यावरून, 'कोर्टाने सरकारला जागा दाखवली', असा टोला राज यांनी लगावला.

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सुट्टीवर पाठवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने केंद्र सरकारला चांगलाच धक्का बसला आहे. कारण, आलोक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाचं सरकारकडून समर्थन करण्यात आलं होतं. त्यावरून राज ठाकरे यांनी आज नवे व्यंगचित्र रेखाटले आहे. 
या व्यंगचित्रामध्ये न्यायमूर्ती हे आलोक वर्मा यांना या बस्सा म्हणून सांगताय, असं दाखवण्यात आलं आहे. तर नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या कटघऱ्यात दाखवण्यात आलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours