सोलापुर, 09 जानेवारी : कारला अपघात झाल्यामुळे सोलापुर जिल्हयातल्या दोघांचा मृत्यु झाला आहे तर 3 जण जखमी झाले आहेत. गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहीमेत तैनात पोलीस उपनिरीक्षक पतीला भेटायला येत असताना हा अपघात झाला आहे.
चंद्रपूर जिल्हयात: भरधाव कारची झाडाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीसह  दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. कारमधून प्रवास करणार सगळे जण सोलापुर जिल्हयातले आहेत.
चंद्रपूर मार्गावरील केसलाघाट इथे ही घटना घडली आहे. सचिन माळी हे गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानात कार्यरत आहेत. त्यांची पत्नी आकांक्षा सचिन माळी भावासह सोलापूरहुन गडचिरोलीला कारने येत असताना चालकाचं कारवरील नियंञण सुटल्याने ही घटना घडली.
यात आकांक्षा सचिन माळी आणि पवन नन्नावरे  या दोघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यु झाला तर मुलगा अंश सचिन माळीसह सागर सूर्यकांत शिंदे, नितीन वाढई  हे तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजिकच्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, आपल्या पत्नीला अशा पद्धतीने गमावल्यामुळे सचिन यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण माळी कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours