मुंबई: उदयनराजेंना तिकीट देऊ नका अशी कुणीही मागणी केलेली नाही. माध्यमांना कुठून समजलं ते मला माहीत नाही, पर या विषयावर लवकरच मी माझ्या वेळेप्रमाणे सगळ्यांची एकत्र बैठक घेणार असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे इतर आमदार उभे ठाकले आहेत. उदयनराजेंचे नक्की काय करायचं यावर सोमवारी बारामतीत एक बैठक पार पडली. या वादाचा पहिला टप्पा बारामतीत पार पडला असे देखील म्हणता येईल. या बैठकीत उदयनराजेंचं नक्की काय करायचं? या विषयावर राष्ट्रवादीचे प्रमुख आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील हे या बैठकीस उपस्थित होते. ही सभा गोपनीय होती, कोणालाच या बाबत काहीच माहिती देण्यात आली नसल्याने उदयनराजेंबाबत शरद पवारांनी नेमकी कोणती भूमीक घेतीलय याबाबत अनेक तर्क वितर्क वर्तविले जात होते.

विशेष म्हणजे, मागील शनिवारी पक्षाचे खासदार उदयनराजे यांनी साताऱ्यात शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर फसवाफसवी करू नका, नाहीतर आम्हालाही कळतं, असं त्यांनी विधान केलं होतं. त्यानंतर शरद पवारांनी उदयनराजे यांचाबाबत बोलण्याचे टाळले होते. त्यांनी माझ्याकडून भेटीची वेळ मागितली आहे. साताऱ्यातील भाकरी करपली आहे या प्रश्नाला त्यांनी नाही म्हणून उत्तर दिले आणि अजून मी तव्यापर्यंत पोहचलो नाही असं म्हणत पवारांनी उदयनराजेंच्या उमेदवारीच्या प्रश्नाला बगल दिली होती.

राष्ट्रवादीचे इतर आमदारांसर सर्वच राजकीय क्षेत्रात उदयनराजेंबाब उदयनराजेंबाबत नेमकी कोणती भूमीक घेतीलय जातेय याबाबत उत्सुकता वाढलेली असताना पक्षश्रेष्ठींनी आपलं मत आज व्यक्त केलंय. उदयनराजेंना तिकीट देऊ नका अशी कोणीही कुणीही मागणी केली नसल्याचं स्पष्ट करताना, माध्यमांना ही माहिती कोणी आणि कुठून दिली याबाबत त्यांनी साशंकता व्यक्त केलीय. लवकरच माझ्या वेळेप्रमाणे सगळ्यांची एकत्र बैठक घेणार असल्याचं शरद पवारांनी जाहीर केलंय.

देशाच्या सरंक्षणाच्या दृष्टीने राफेल अतिशय महत्वाचं 

राफेल बाबत किमतीची माहिती सरकारकडे मगितलीये. सरकार जे गोपनीय असल्याचं सांगतंय तो तंत्रज्ञानाचा भाग आहे. मी ही सरंक्षणमंत्री होतो, राफेल देशाच्या सरंक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं असून किमतीची माहिती जाहीर करायला हरकत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours