मुंबई: ग्रामीण महाराष्ट्रातल्या बारावीपर्यंतच्या विद्यार्थिंनींना एसटीचा मोफत पास देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाचा थेट फायदा 24 लाख विद्यार्थिनींना होणार आहे.
याआधी एसटीकडून दहावीपर्यंतच्या विद्यार्थींनीना मोफत पास देण्यात येत होता. या योजनेसाठी 44 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचं समजतंय. याशिवाय एसटीकडून विविध घटकांसाठी वेगवेगळ्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, अधीस्वीकृती धारक पत्रकार, अपंग यांचा समावेश आहे.
ग्रामीण भागातील आता 12 वी पर्यंत एसटी चा मोफत पास देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिलीय. या पूर्वी मुलींना 10 वि पर्यंत मोफत सवलत पास देण्यात येत होता, या योजनेमुळे 24 लाख विद्यार्थिंनींना फायदा होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना 44 कोटी रुपयांचा भार एसटी महामंडळाला सोसावा लागणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours