संपादिका सुनीता परदेशी
प्रतिनिधी/भंडारा।१7 सप्टें
भंडारा गोदीया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार नान पटोले यांनी भाजप सोडल्या नंतर गेल्या प्रथम महाराष्ट्राचे काँग्रेस उपाध्यक्ष म्हणुन पद देण्यात आला होता. त्या नंतर भंडारा गोदीया येथील पोट निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मधुभाऊ कुकडे याना जिंकुन आणन्या मध्ये किंग मेकरची भूमिका निभवत जन सामन्यांमध्ये आपली प्रतिमा रुजून काढली त्यामुळे लगेच तिन महिण्या नंतर त्यांना परत दिल्ली येथुन चालणाऱ्यां राजकारणात सक्रिय करण्याकरीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ते राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिनांक १५सप्टेंबरला भंडारा-गोंदिया घे माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची पदोन्नती करत राष्ट्रीय काँग्रेस किसान खेत मजदुर ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.आज प्रथमच दिल्ली येथील अकबर रोड वरील कॉंग्रेस पक्षाचा मुख्य कार्यालयातील किसान खेत मजदुरचे राष्ट्रीय अध्यक्ष पदाची सूत्रे आपल्या हाती घेतली. यावेळी देशातील अनेक भागातून कार्यकर्ते व नेत्यांची रेलचेल होती. सर्वांनी नानाभाऊंचे जंगी स्वागत केले.
यावेळी बोलताना नानाभाऊ म्हणाले
आज मला कॉंग्रेस पक्षाचे संन्मानिय राष्ट्रीय अध्यक्ष श्री राहुल जी गांधी यांनी राष्ट्रीय किसान मजदुर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्त केली सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे..
तसेच
आपण सर्वांनी अभिनंदन करुन जे प्रेम दिले ते मला तुमच आशिर्वाद आहे.
देशात शेतकरी , कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू व देशभरात मजबूत संघटन उभे करू
Post A Comment:
0 comments so far,add yours