(एका वृद्ध महिला लाभार्थिची :शासनाला अर्थ हाक*)
लाखनी तहसील कार्यालयाचा अफलातुण प्रकार*
जिल्हा संपादक शमीम आकबानी, क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर
लाखनी- संजयगांधी स्वावलंबन विभागाकडुन संजय गांधी निराधार याेजना राबवुन तहसील कार्यालयामार्फत बँक खात्यात अनुदान जमा केले जाते.या विभागात कार्यरत कर्मचाऱ्याने एका ७० वर्षिय जिवंत वृध्द महिलेस मृत दाखवुन अर्थसहाय्य बंद केल्याचा संतापजनक प्रकार लाखनी तहसील कार्यालयामधे उघडकीस आला आहे.(निंबाबाई किसन भैसारे रा.मिरेगाव,ता.लाखनी असे तिचे नाव आहे)
----या अर्थसहाय्या-अभावी निराधार वृध्द महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे.
------ग्रामिण भागातील निराधार,अपंग,विधवा,वयाेवृध्द व्यक्तिंना तहसील कार्यालयाच्या अधिनस्त संजयगांधी नीराधार याेजना ,राष्ट्रिय वृध्दापकाळ,इंदिरागांधी भुमिहीन शेतमजुर व इतर याेजने अंतर्गत मासिक ६००रु.अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.या साठी लाभार्थि त्या तालुक्यातील रहिवासी असावा,त्याचे वार्षिक उत्पन्न २१हजारापेक्षा कमी असावे,विधवा महिलांना १८ वर्षावरिल अपत्य नसावे,वृध्दापकाळ याेजनेकरिता वयाेमर्यादा ६५ वर्ष असावी.या याेजनांचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने आवश्यक प्रमाणपत्र जाेडुन तलाठ्यामार्फत तहसील कार्यालयाकडे अर्ज करावा लागताे व ताे संबधित समितीच्या मंजुरीने लाभार्थ्यांना अर्ज दिला जाताे.
-------निंबाबाई किसन भैसारे(७०)रा. मिरेगाव हे नि:संतान असुन तिने ५ते७ वर्षापुर्वि वृध्दापकाळ याेजनेअंतर्गत अर्थ सहाय्यकरिता अर्ज केला हाेता.गरजु लाभार्थि असल्याने तिचा अर्ज मंजुर हाेऊन मागील ५ वर्षापासुन तिच्या बँक आँफ इंडिया च्या मुरमाडी /तुप येथील खात्यात नियमीत अर्थसहाय्य ची रक्कम जमा हाेत हाेती.पण मागील १वर्षापासुन रक्कम जमा झालीचं नाही.तिचे राहते घरही पडल्यामुळे ति दिघाेरी येथे दुरच्या नातेवाईकाकडे राहतं आहे.
असे उघड झाले प्रकरण
मागिल १ वर्षापासुन निंबाबाई भैसारे यांच्या कडुन बँक खात्यात वृध्दापकाळ याेजनेच्या अर्थसहाय्याची रक्कम जमा हाेत नसल्याची तिने एका सामाजिक कार्यकर्त्यास तिने सांगितली असता काही कामा निमीत्त ते तहसील कार्यालयातील संजय गांधी स्वावलंब विभागात गेले असता चाैकशी केली असता त्या वेळी सदर महिला मृत्यु पावल्याने तिचे अर्थसहाय्य बंद करन्यात आल्याचे सांगन्यात आले.
Post A Comment:
0 comments so far,add yours