मुंबई- महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे भाजप आमदार राम कदम यांनी दिलगिरी व्यक्त केलीय पण माफी मागितलेली नाही. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नव्हता, दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं, ट्विट राम कदम यांनी केलंय. माझं विधान पूर्ण दाखवलं नाही आणि जाणूनबुजून संभ्रम निर्माण केला, असा दावाही कदमांनी केला. कदमांनी खेद व्यक्त केला असला तरी माफी मागितलेली नाही. अर्धवट विधान दाखवून काही विरोधकांनी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला.
भारतातल्या सर्वात मोठ्या दहीहंडीचं आयोजन केल्याचा दावा करणाऱ्या राम कदमांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईसाठी कदमांनी गोविंदांचा अपमान केल्याचे मोठ्या प्रमाणात बोलले जात आहे. त्याचे झाले असे की, सातव्या थरापर्यंत चढलेल्या गोविंदाला राम कदम यांनी बळजबरीने खाली उतरवलं. त्यामुळे गोविंदा पथकाचा हिरमोड झाला. त्यामुळे दहीहंडीचं आयोजन गोविंदा पथकासाठी की अजून कोणासाठी असा सवाल उपस्थितीत होत आहे.
दरम्यान यापुढे लग्नाला नकार देणाऱ्या मुली पळवण्यासाठी तरूणांनी राम कदमांना फोन केला तर आश्चर्य वाटायला नको. कारण खुद्द राम कदमांनीच तसं आवाहन केलंय. तुमचे आईवडील म्हटले, साहेब आम्हालाही पोरगी पसंत आहे,तर काय करणार मी? तिला पळवून तुमच्याकडे आणणार, असे वक्तव्य कदमांनी केले. त्यांच्या या वक्तव्याचाच सर्वत्र विरोध होत आहे. राम कदमाचं नाव राम बदलून रावण ठेवा अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours