ठाणे- ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील पाण्याची टाकी रात्री 10 च्या सुमारास अचानक फुटली. एका महिन्यापूर्वी याच टाकीचा पाईप फुटला होता. अचानक टाकी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान हे पाणी आजूबाजूच्या घरामध्ये शिरल्याने नागरिकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. याआधीही या टाकीचा पाईप फुटला होता. या परिसरात तीन टाक्या आहेत आणि या टाक्या २०  वर्ष जुन्या आहेत. या टाक्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळे आणि महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे आज परत पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours