मुंबई: घाटकोपर येथील भाजपाचे आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. भारतातील सर्वात मोठी हंडी म्हणून आयोजित केलेल्या या उत्सवामध्ये अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली. मात्र याच उत्सवामध्ये गोविंदांशी संवाद साधताना राम कदम यांनी महिलांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप राष्ट्रवादी क्राँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
'मुलीची लग्नाला परवाणगी नसेल तर तिला पळवून आणू' असं भाजप आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे आणि याचाच एक व्हिडिओ आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करत  राम कदम यांच्यावर टीका केली आहे.
राम कदम यांच्या भाषणाची क्लिप शेअर करत आव्हाड म्हणतात 'बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्यांमध्ये आणखी एकाची भर. रक्षाबंधन, दहिकाला उत्सव या पवित्र सणांच्या दिवशी आमदाराने तोडले आपल्या अकलेचे तारे! ' ट्विटच्या शेवटच्या ओळीमध्ये त्यांनी कदम यांच्यावर टीका केली. 'कशा राहतील यांच्या राज्यात महिला सुरक्षित?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours