सोलापूर : राज्य सरकारच्या विरोधातली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज सोलापूरमध्ये आहे. यावेळी झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. राज्यातलं भाजपचं सरकार म्हणजे थापाड्यांचं सरकार असून हे सरकार सहा महिन्यांमध्ये खाली खेचू असा इशारा त्यांनी दिला. भाजपने दिलेलेलं एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. सर्व खोटी आश्वासनं दिलीत. आता त्यांच्या पापांचा घडा भरला आहे, जनताच त्यांना धडा शिकवेल असंही ते म्हणाले.
चव्हाणांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे
महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जनसामान्यांच्या सुखासाठी ही जनसंघर्ष यात्रा आम्ही सुरु केलीय.
येत्या सहा महिन्यात भाजप सरकार खाली खेचायचं आहे. त्यासाठी आम्ही जनसामान्यात जात आहे.
भाजपने खोटी आश्वासने दिली. आता भाजपच्या पापाचा घडा भरलाय.
हिंदु मुस्लिम, हिंदु दलित भांडण लावण्याचा उद्योग भाजपने सुरु केलाय.
सनातन संस्थेचे कार्यकर्ते पकडले मात्र एकही भाजप नेता बोलायला तयार नाही.
मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे हेच भाजपचं धोरण
नरेंद्र मोदी म्हणाले होते, सुशीलकुमार शिंदे साहेबांनी पोलिसांचे युनिफॉर्म शिवायला हवे होते. मात्र चार वर्षे झाली तरी मोदींनी पोलिसांचे युनिफॉर्म का शिवले नाही.
वस्त्रोद्योग व्यवसाय बंद पडण्याच्या अवस्थेत आहे कारण सरकारची धोरणं चुकत आहेत.
हातमाग बंद आहे आता यंत्रमागही बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
नोटाबंदीनंतर ९० टक्केहून अधिक जुन्या नोटा बॅंकेत परत आल्या आहेत.
मोदीजी, देवेंद्रजी जवाब दो.... चार साल मे क्या किया? असा प्रश्न जनता विचारत आहे.
स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, काहीही झालेले नाही, लोकांना भीक मागायची वेळ आलीय.
राज्यात Hyperloop नावाची नवीन गोष्ट महाराष्ट्रात येणार आहे. देवेंद्र फडणवीस नवीन काहीतरी घेऊन येतायत. दोन मिनिटांत पुण्यातून मुंबईत जाता येते असा दावा करतायत. हे तंत्रज्ञान अमेरिकेत, जपानमध्ये नाही मग महाराष्ट्रात कोठून आले. फेकाफेकी बंद करा राव.
MIM चे भूत इकडे आले होते ते हाकलून द्या. आम्ही नांदेड मधून हाकलून दिलेय.
MIM हे भाजपची बी टीम आहे.. MIM चे भूत गाढून टाका.
महिला सुरक्षित नाहीत. देशात गुन्हेगारीत महाराष्ट्र एक नंबरला आहे.
फेकाफेकीची सर्वात मोठी फॅक्टरी म्हणजे भाजप सरकार आहे.
महाराष्ट्राचे आमदार राम कदम म्हणतायत, तुम्हाला एकादी मुलगी हवी असेल तर सांगा मी पळवून आणतो असे विधान भाजपचे आमदार करतायत हे धक्कादायक आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours