नाशिक, 29 सप्टेंबर : नाशिकच्या जिल्हा रुग्णालय परिसरातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. रुग्णालय परिरात फेकण्यात आलेल्या मृत अर्भकाचा कुत्र्याने लचका तोडल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी आदिवासी महिलेची प्रसूती झाली होती. पण प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. हे मृत अर्भक नातेवाईकांनीच जिल्हा रुग्णालय आवरत फेकून दिलं असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या मृत अर्भकाला आवारात फेकल्यानंतर परिसरातील कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले. अगदी मन हेलावून टाकणारी ही घटना आहे. पण मृत अर्भकाला नातेवाईकांनीच असं फेकून का दिलं याचं मात्र नेमकं गुढ अद्याप समोर आलेलं नाही.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालय परिसरात कुत्र्यांचा वावर जास्त आहे. त्यामुळे आठवडाभर पडलेल्या या मृत अर्भकाचा कुत्र्यांनी लचका तोडला आहे. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे परिसरात खळबल उडाली आहे. दरम्यान, यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours