औरंगाबाद: कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पक्षाच्या विरोधात दंड थोपडले आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केलीये. हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहे.

कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असतात. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जाधव उपोषणाला बसले होते. सरकारने लवकरात लवकर मागण्या कराव्यात यासाठी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यावरून एकच गोंधळ उडाला होता. त्यानंतर पक्षातून तंबी दिल्यानंतर जाधव यांना माघार घ्यावी लागली होती.

त्यामुळे नाराज झालेल्या हर्षवर्धन जाधव यांनी नव्या पक्षाची घोषणा केली होती. अखेर आता जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकलाय आणि आपल्या नव्या पक्षाची घोषणा करत लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय.

जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे खासदरकीची हॅटट्रिक साधणारे चंद्रकांत खैरे यांच्या पुढे उभे ठाकले आहे. जाधव लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours