मुंबई: मुंबईत घर विकत घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. कारण लवकरच म्हाडा मुंबईतल्या 1 हजार 194 घरांसाठी लॉटरी जाहीर करणार आहे. या लॉटरीसाठी तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायची गरज नाही. कारण दिवाळीपूर्वीच म्हणजे साधारणतः महिनाभरातच म्हाडाची मुंबईतल्या घरासाठी लॉटरी जाहीर होणार आहे. म्हाडाचे नवनिर्वाचीत अध्यक्ष उदय सामंत यांनी न्यूज18 लोकमतला लॉटरीसंदर्भात माहिती दिली.

सायन, घाटकोपर, गोरेगाव, परळ, मुलुंड अशा मोक्याच्या ठिकाणी असलेल्या घरांसाठी म्हाडा लॉटरी जाहीर करणार असल्यामुळं मुंबईत घर घेणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीय. गेल्या महिन्यात कोकण मंडळाच्य घरांची सोडत निघाल्यानंतर, उदय सामंत यांनी मुंबई म्हाडाची लॉटरी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात निघेल असं सांगितलं होतं. म्हाडाचे दर परवडेबल असले तरी, अलीकडे ते सुद्धा सामांन्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या असल्याचे दिसून येत आहे.

यंदा मुंबईतल्या कोणकोणत्या भागात म्हाडा सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न साकार काणार आहे आणि त्यासाठी त्यांना किती किम्मत मोजावी लागेल यावर टाकूया एक कटाक्ष..
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours