साकाेली- संदीप क्षिरसागर
साकाेली-----दि.१४-९-२०१८ राेजी नगरपरिषद साकाेली येथे दि.१३-९ ते दि.२३-९-२०१८ पर्यन्त साजरा करण्यात येणाऱ्या गणेश उत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने शांतता समितीची बैठक आयाेजित करण्यात आली.सदर उत्सवा दरम्यान अति उत्साहीत लाेकांच्या आक्षेपार्ह कृत्यावरुन,घाेषनावरुन,रंग उडवन्यावरुन अथवा माेबाईल सारख्या प्रसार माध्यमाद्वारे माहिती प्रसारित करुन प्रसंगी वाद विवाद हाेऊन,जातिधर्मामधे तेढ निर्माण हाेऊन लाेकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेण्याची शक्यता असते.सदर उत्सव शांततेने व निर्विघ्नपणे पार पाडावे तसेच जातिय ऐक्य व सलाेखा कायम टिकुन रहावा या करिता तालुका स्तरिय शांतता समितीचे सदस्य ,सार्वजनिक उत्सव मंडळाचे पदाधिकारी,डिजे साऊंड चे मालक,परिसरातील पाेलीस पाटील व महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष यांच्या साेबत सार्थक चर्चा करुन काही उपाययाेजना करण्यात आली.सदर सभेचे अध्यक्ष भंडारा जिल्हा पाेलीस अपर अधिक्षक रश्मि नांदेडकर,तहसिलदार साकाेली अरविंद हिंगे,धनवंता राऊत नगराध्यक्ष साकाेली,मनिष कापगते नगरसेवक,रवी परशुरामकर नगरसेवक, पाेलीस निरीक्षक पिपरेवार यांच्या प्रमुख उपस्थिती मधे सभा पार पडली.सदर सभेला पाेलीस उपनिरीक्षक रविंन्द्र रेवतकर, धनश्री डहाके, पाेलीस हवा.ग्यानिराम गाेबाडे,स्वनिल भजनकर,अमितेश वडेट्टिवार,व पाेलीस शिपाई दिपक साेनाेने,नरेन्द्र झलके यांनी विशेष प्रयत्न केले।


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours