मुंबई, 30 ऑक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं आहे. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावरून राज यांनी मोदींवर निशाणा साधला.
पुतळ्यांवर होणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या नरेंद्र मोदींना सवाल केला आहे. ‘अरे तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी अवाढव्य खर्च करून आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती माणसं जगवा ना! असं या व्यंगचित्रात सरदार वल्लभभाई पटेल हे नरेंद्र मोदी आणि आत्ता केंद्रात मंत्री असणाऱ्या नेत्यांना म्हणताना दिसत आहेत. दुसरीकडे, या व्यंगचित्रातून राज ठाकरे यांनी एक उपरोधिक सवालही केला आहे. पुतळ्याचा खर्च 2 हजार 290 कोटी आहे, हे वल्लभभाई यांना तरी कसे पटेल? असं राज म्हणाले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours