मुंबई: शिवसेनेला उत्तर भारतीय लोकांची मते ही पाहिजे आणि हप्ते ही पाहिजे अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. आज काही शिवसैनिकांनी उत्तर भारतीयांना जागेच्या वादावरून मारहाण केली त्याच प्रकरणी मनसेने शिवसेनेवर टीका केली आहे.
शिवेसना नेते एका बाजूला म्हणतात 'उत्तर भारतीय के सन्मान ने शिवसेना मैदान मे' आणि दुसरीकडे त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचं देशपांडे यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओला-उबेर कंपन्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार काही करत नाहीत असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
तर ओला आणि उबरप्रमाणे भविष्यात मनसे अॅप करण्याचा विचार करत असल्याचंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. गेल्या 4 दिवसांपासून बुलडाणा जिल्ह्यात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी करत आहेत.
आज राज ठाकरे यांनी जगप्रसिद्ध लोणार सरोवराला भेट दिली असून उल्कापातामुळे तयार झालेल्या या एकमेव खाऱ्यापाण्याच्या सरोवराची माहिती जाणून घेतली. यावेळी मनसेचे बाळा नांदगावकरही उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours