मुंबई, 12 आॅक्टोबर : अपघाताची माहिती मिळताचा आपात्कालीन परिस्थितीत धावून येणारी रुग्नवाहिकेला आजपासून ब्रेक लागणार आहे. या रुग्नवाहिकेची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या विरुद्ध रुग्णवाहिकेच्या डॉक्टर, चालक आणि कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केलीये.
राज्यातील आपत्कालीन सेवा म्हणून 108 क्रमांकाची रुग्णवाहिका ओळखली जाते. या रुग्णवाहिकेची भारत विकास ग्रुपवर जबाबदारी सोपवण्यात आलीये. मात्र, या कंपनीने मनमानी करीत नियम धाब्यावर बसवून कर्मचाऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप महाराष्ट्र माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियनचे अध्यक्ष समीर करबेले यांनी केला. त्यामुळे राज्यभरातील कर्मचारी आणि डाॅक्टर या संपात सहभागी झाले आहे.
वेतनवाढ, वेतन करार, ड्रायव्हर आणि डॉक्टरांची होणारी पिळवणूक, अधिकचे ड्युटीचे तास अशा विविध मागण्यांसाठी हा संप करण्याचा निर्णय घेतलाय.
याबाबत औद्योगिक न्यायालय, आरोग्यमंत्री, कामगारमंत्री, प्रधान सचिव, आरोग्य सचिव, आरोग्य संचालक, सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन, पोलीस अधीक्षक, सर्व महापालिका आयुक्त यांना २८ सप्टेंबरला पत्र पाठवून कळवल्याचं समीर करबेले यांनी सांगितलंय.
दरम्यान, या संपाबाबत कर्मचाऱ्यांनी कोणतीही कल्पना राज्य सरकारला दिलेली नाही. त्यामुळं संप केल्यास कारवाई करू अशा इशारा आरोग्य संचालक संजीवकुमार कांबळे यांनी दिलाय.
Post A Comment:
0 comments so far,add yours