12 आॅक्टोबर : 'मी टू' वादळात आता बॉलिवूडचे 'शो मॅन' अशी ओळख असलेले दिग्दर्शक सुभाष घई यांचेही नाव आले आहे. घई यांच्या कंपनीतील एका माजी कर्मचारी महिलेने घई यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाय. घई यांनी ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळून ते मला पाजले आणि नंतर मी नशेत असताना हॉटेलमध्ये नेऊन माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप या महिलेने केलाय.
या महिलेने आपले नाव गुप्त ठेवले असून तिची व्यथा लेखिका महिमा कुकरेजाने एका पोस्टच्या माध्यमातून ट्विटरवर मांडली आहे.
महिमा कुकरेजा यांनी सांगितलंय की, 'पीडित महिला ही मीडियामध्ये मोठ्या पदावर काम करते, तिला आपले नाव गुप्त ठेवायचे आहे.'
खूप वर्षांपूर्वी घई यांच्यासोबत एका सिनेमात काम केलं होतं. त्यावेळी घई यांनी स्क्रिप्टसाठी नेहमी आपल्या घरी बोलावयचे असा दावाही या महिलेनं केलाय.
कारमधून घरापर्यंत ड्रॉप देताना ते वारंवार मला स्पर्श करायचे. मला मिठीत घ्यायचे. त्यानंतर एक दिवस घई यांनी मला त्यांच्या टू बीएचके फ्लॅटमध्ये बोलावले.एक दिवस त्यांनी मला किस करण्याचाही प्रयत्न केला. त्यावर नाराजी व्यक्त करून मी तडक निघून गेले असा आरोप या पीडित महिलेनं केलाय.
तसंच या महिलेने आरोप केलाय की, एकेदिवशी रेकॉर्डिंगला उशीर झाला आणि घई यांनी वाटेतच ड्रिंक घेण्याचे ठरवले. त्यांनी मलाही ड्रिंक घेण्याचा आग्रह केली. मी तो मानून ड्रिंक घेतलं मात्र त्यात कोणतातरी अमली पदार्थ मिसळण्यात आला होता. त्यानंतर मला एका हाॅटेलमध्ये घेऊन गेले आणि तिथे लैंगिक अत्याचार केला असा आरोप या महिलेनं केलाय.
73 वर्षीय घई यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. ही फार दुखद बाब आहे. एका प्रसिद्ध व्यक्तीची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकार आहे. यात काहीही तथ्य नाही. या महिलेचे सर्व आरोप खोटे आहे असं घई यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. घई यांनी संबंधित महिलेविरुद्ध मानहानीचा दावा ठोकण्याचा इशाराही दिला आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours