मुख्य सम्पादिका: सुनीता परदेशी
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचा सहभाग
शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचा सहभाग
यवतमाळ: दिल्ली येथे उद्या (दि.23 ऑक्टो.) ला संसद भवनावर होणा-या घेराव आंदोलनासाठी यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे शेकडो कार्यकर्ते दिल्लीत धडकले आहेत.
मोदी सरकारला त्यांनी शेतक-यांना दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी अखिल भारतीय काॅग्रेस कमिटी किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी खासदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यातून शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार तसेच माजी जि.प.सदस्य मिलिंद धुर्वे, यशवंत इंगोले, किरण कुमरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी दिल्ली गाठली आहे. उद्या ते आंदोलनात सहभागी होणार आहेत.
2014 निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने देशातील शेतकरी, शेतमजुर व सर्वसामान्यांना विवीध गोष्टींची आश्वासने दिली होती. भाजपाच्या जाहिरनाम्यातही भाजपाने जुमलेबाजी केली होती. मात्र त्यातील एकाही आश्वासनांची पुर्तता भाजप सरकारला करता आली नाही. 2014 मध्ये देशातील शेतकरी वर्गाने प्रथमच भाजपाला भरभरून मते दिली.
स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, उत्पादन खर्च व 50 टक्के नफा विचारात घेऊन शेतमालाला भाव, शेतमालाला 24/7 वीजपुरवठा, सरसकट कर्जमाफी, कापसाला 7 हजार व सोयाबीनला 5 हजार प्रतिक्विंटल भाव देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या चार वर्षात एकाही आश्वासनाची पुर्तता पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारने केली नाही. त्यामुळे त्यांना या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काॅग्रेसच्या किसान सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या सक्षम नेतृत्वात संसदेला घेराव घालण्यात येणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours