यवतमाळ, 21 ऑक्टोबर : लाडखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दक्षेशश्वर मंदिराच्या कुंडात ११ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. ओम विनोद राऊत असे मृतक बालकाचे नाव आहे.
मृतक ओम राऊत लाडखेड येथील इंदिरा नगरमध्ये राहत होता. शनिवारी तो आपल्या मित्राबरोबर मंदिराच्या कुंडामध्ये पोहण्याकरिता गेला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून या कुंडात गाळ साचलेला आहे. या गाळामुळे कुंडातील पाण्याचा अंदाज त्याला आला न आल्याने त्यात कुंडात बुडून मृत्यू झाला.
तो बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून बाकिच्यांना गोळा केलं. नागरिकांनी लगेच कुंडाकडे धाव घेतली. मात्र तोवर उशीर झाला होता. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. अखेर पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि मृतक ओम राऊत याला कुंडातून बाहेर काढलं. लालखेड पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours