अमरावती, 21 ऑक्टोबर : सायंकाळी शेतात गेलेल्या एका शेतकऱ्याची वाघाने शिकार केलीय. ही घटना धामणगाव तालुक्यातील मंगरूळ दस्तगिर येथे शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. राजेंद्र देविदास निमकर (४८) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.
गावापासून आठ किलोमीटर अंतरावर राजेंद्र यांचे शेत आहे. शुक्रवारी सायंकाळी ते शेतात गेले होते. बराच वेळ होऊनही ते परत न आल्यामुळे राजेंद्र यांचे नातेवाईक त्यांना पहाण्यासाठी शेतात गेले. मात्र, त्यांना शेतात राजेंद्र यांचे केवळ अंतरवस्त्रच आढळले. काही अंतरावर त्यांचं डोकं आढळून आलं. वाघाच्या पावलांचे ठसे पहायला मिळाले.
देवळी भागातील वाघ य़ा परिसरात आल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. वाघाने त्यांची शिकार केल्याने अर्धे गाव त्याचं धड शोधण्यासाठी शेतशिवारात दाखल झाले होते.
वाघाने अतिशय क्रूरपणे त्यांचं डोकं धडावेगळं केलं करुन त्यांना जवळपास 200 मीटर पर्यंत फरफटत नेलं होतं. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर गस्त घातली. शनिवारी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान निमकर यांचा मृतदेह वनविभागाच्या हाती लागला. वाघ हा भुकेल्या अवस्थेत असल्याने त्याने माणसाची शिकार केली असावी असे सहायक वन संरक्षक अशोक कविटकर यांनी न्यूज18 लोकमतला सांगितले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours