21 आॅक्टोबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणातली फटकेबाजी सर्वश्रूत आहे. त्यांचा रांगडा स्वभाव पत्रकार आणि तमाम कार्यकर्त्यांना चांगलाच परिचित आहे. पण राज ठाकरे यांच्यात साधेपणा पाहण्यास मिळालाय़.

राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे मेळघाटातील दुर्गम भागातील गावांना भेट दिली.

चिखलदऱ्यापासून ४० किलोमीटर अंतरावरच्या चिलाटी गाव आणि आसपासच्या भागात त्यांनी भेटी दिल्या.
मैत्री संस्थेच्या विविध प्रकल्पना भेट दिल्यावर दुपारी रुईपठार ह्या गावी सेलूकर कुटुंबियांच्या घरी राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेवण केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours