शिर्डी, 21 ऑक्टोबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (रविवार) शिर्डी दौऱ्यावर असणार आहेत. उद्धव ठाकरे यांची शिर्डी आणि अहमदनगर येथे जाहीर सभादेखील होणार आहे. या सभांमधून ते आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर काही दिवसांतच उद्धव ठाकरेही शिर्डीत दाखल होत आहेत. त्यामुळे दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे शिर्डीतून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर हल्ला चढवणार का, याबाबत उत्सुकता आहे.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या भाऊसाहेब वाकचौरे यांचा पराभव केला होता. आता लोकसभेच्या दृष्टीने उद्धव काय दिशा देतात, यावर शिवसैनिकांचं लक्ष असेल.

दरम्यान, महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थितीवरुन उद्धव ठाकरे आज राज्य सरकारवर तोफ डागणार का, हे पाहावं लागेल. कारण नुकत्याच झालेल्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आणि महाराष्ट्रातील दुष्काळ अशा मुद्द्यांवरुन केंद्र आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं.

 दसऱ्या मेळाव्यातील भाषणात काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

चांगलं काम करण्यासाठी छाती नाही, हिंमत पाहिजे. मनगटात जोर पाहिजे.
सरकार भाववाढ रोखण्यास अपयशी. विष्णुचा अकरावा अवतार तुमच्यासोबत असतानासुद्धा तुम्हाला महागाई रोखता येत नाही. हे कसलं सरकार ?
एकदाचं सांगा मंदिर केव्हा बांधायचंय ते. तुम्ही सांगा नाही तर आम्ही बांधतो. त्याचीच आठवण करून द्यायला मी अयोध्येत जातोय. २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार.
सरकारमध्ये धमक नाही. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना दुष्काळ का जाहीर करत नाही. लवकरच दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना सरकारविरुद्ध आंदोलन करणार.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours