इंदुर: पुण्यात भारतीय सैन्यातील चार कर्मचाऱ्यांनी लष्कराचा रुग्णालयात एका मूकबधीर महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडलीये. या घटनेची पीडितेनं तक्रार दाखल केल्यानंतर विभागीय चौकशीचे आदेश दिले आहे. मात्र, या चार कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेनं सुरक्षा मंत्रालय, लष्करप्रमुखांकडे धाव घेतली. त्यानंतर सुरक्षा मंत्रालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून पीडित महिलांसाठी कार्यरत असलेली पोलीस हेल्पलाईन इंदुर इथं पोहोचली असून इंदुर डीआयजीने या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिलंय.

पुण्यातील लष्कराच्या रुग्णालयामध्ये एका मूकबधीर दिव्यांग महिलेसोबत अत्याचाराची घटनासमोर आलीये. या प्रकरणी पीडित महिला न्याय मिळावा यासाठी इंदुरला पोहोचली. या पीडित महिलेनं पोलीस हेल्पलाईन प्रभारी पुरोहित दाम्पत्यांकडे मदत मागितली. डीआयजीकडे तक्रार दाखल केल्यानंतर डीआयजीने मदत करण्याचं आश्वसान दिलंय.

पीडित महिला ही पुण्यातील खडकी येथील लष्कराच्या रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करते. या पीडित महिलेला सर्वात आधी रँक नायकने २०१४ मध्ये धमकी देऊन अत्याचार केले. त्यानंतर या पीडित महिलेनं याच रुग्णालयातील नर्सिंग असिस्टंटला एसएमएस करून आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली.

परंतु, नर्सिंग असिस्टंटने मदत करण्याचे आश्वासन देऊन पीडित महिलेवरच अत्याचार केला. त्यानंतर वारंवार या पीडित महिलेवर दोन्ही कर्मचाऱ्यांनी अत्याचार केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours