मुंबई: मुंबईतील दादर फुलमार्केटमध्ये गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं दिल्लीतून ३ जणांना अटक केलीये. तीन दिवसांपूर्वी दादर फूलमार्केटमध्ये मनोज मोर्या या व्यापाऱ्याची हत्या झाली होती.
१२ आॅक्टोबर रोजी गजबजलेल्या दादरच्या फुल मार्केटमध्ये सकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. फुल मार्केट परिसरातील एका इमारतीजवळ अज्ञात हल्लेखोरांनी मनोज मोर्या यांच्यावर गोळीबार करून फरार झाले होते. जखमी अवस्थेत मनोज मोर्या यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मुंबईतील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबाराच्या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सूत्र हलवली. तीनच दिवसांत दिल्लीतून तीन जणांना अटक केलीये. मनोज मोर्या यांच्यावर गोळीबार करणारे तिन्ही हल्लेखोर हे दिल्लीत रहिवासी आहे.
मनोज आणि त्याची पत्नी हे दोघेही २०१५-१७ या काळात दिल्लीतील एका कंपनीत काम करत होते. पण कंपनीत काही वाद झाल्यानंतर २०१७ मध्ये दोघेही दिल्लीतून मुंबईत आले. याच वादातून सूड उगवण्यासाठी कंपनी मालकाने ५० हजारांची दोन हल्लेखोरांना सुपारी दिल्याचं कळतंय.
मनोज मोर्याच्या हत्येची सुपारी घेऊन तिन हल्लेखोरांनी मुंबईतील मनोज मोर्याच्या घराजवळ रेकी केली आणि १२ आॅक्टोबर रोजी सकाळी मनोज मोर्यावर दादरच्या फुल मार्केट परिसरात गोळ्या झाडून हत्या केली. हत्या केल्यानंतर हल्लेखोर दिल्लीला पळून गेले.
या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून व्यावसायिक वादातून हत्या झाली की या मागे आणखी काही कारण होतं याचा तपास पोलीस करत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours