जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी, क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर
भंडारा: शेतजमीनीचे फेरफार करण्याकरीता दोन हजार रूपयाची लाच मागणाºया सानगडी साझा क्र.२४ येथील लाचखोर तलाठ्याला भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहात अटक केली. हिवराज गणपत खोब्रागडे वय ४८ वर्ष असे लाचखोर तलाठयाचे नाव आहे.
तक्रारदार हे साकोली तालुक्यातील सासरा येथील रहीवाशी असुन त्यांनी विहीरगाव येथील गट क्र.३१८ मधील २.९३ आराजी शेत जमीन मुलाच्या नावाने विकत घेतली. सदर शेत जमीनीचे फेरफार करण्याकरीता साकोली येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला असता तलाठी हिवराज गणपत खोब्रागडे साझा क्र.२४ यांनी तक्रारदाराच्या मुलाच्या नावाने शेतीचे फेरफार करून देण्याकरीता तक्रारदाराकडे २ हजार रूपयाची लाच मागितली.
तक्रारदाराने त्यासंदर्भात भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली असता दि.१५ आॅक्टोबर रांजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी सापळा रचुन तलाठी हिवराज गणपत खोब्रागडे यांना तक्रारदाराकडुन शेतीच्या फेरफार करण्याचा मोबदला म्हणुन २ हजार रूपयाची लाच स्विकारतांना रंगेहात अटक केली.आरोपी तलाठी विरोधात साकोली पोलीस स्टेशनमये कलम ७ (अ) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा (सुधारीत) अधिनियम २०१८ अन्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कार्यवाही नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी,पोनि.प्रतापराव भोसले,सफौ.गणेश पडवार,पोहवा.संजय कुरंजेकर,नापोशि. गौतम राऊत,सचिन हलमारे,पोशि.शेखर देशकर,अश्विनकुमार गोस्वामी,पराग राऊत,कोमलचंद बनकर,चानापोशि. दिनेश धार्मीक यांनी केली.
Post A Comment:
0 comments so far,add yours