मुंबई, 13 ऑक्टोबर : अणुशक्ती नगरचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर काही गुंडांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तुकाराम काते थोडक्यात बचावले आहेत.
तुकाराम काते यांनी मेट्रोच्या गैरकारभारावर मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे मेट्रोच्या साईटवर मोर्चा काढला होता. त्यानंतर मेट्रोचं काम करणाऱ्या कंत्राटदारांचे ट्रकही पकडून दिले होते. याचा राग ठेवून मेट्रोच्या कंत्राटदाराने जीवे मारण्यासाठी गुंड पाठवल्याचा आरोप आमदार तुकाराम काते यांनी पोलिसांसमोर व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र नगरमधील नवरात्रीचा कार्यक्रम संपल्यावर तुकाराम काते कार्यकर्त्यांसह बोलत होते. त्याचवेळी काही गुंड हातात तलवारी घेवून तुकाराम काते यांच्या अंगावर धावून आले. मात्र तुकराम काते यांच्या बाॅडीगार्डने त्यांना वाचवलं. हल्ला होताच संपूर्ण परिसरात बोंब उडाली. त्यामुळे तिथून गुंडानी पळ काढला.
हल्लेखोरांनी तलवारी आणि हाॅकीस्टीकचा धाक दाखवून पळ काढला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना यासंदर्भात कळवण्यात आलं. जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले तुकाराम काते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या गंभीर घटनेनंतर मानखुर्द परीसरात तणावपूर्ण वातावरण झालं आहे.
दरम्यान, काते यांच्यावर कोणत्या गुंडांनी हल्ला केला, कातेंना मारण्यामागे त्यांचा काय हेतू होता, याचा आता पोलीस कसून तपास करत आहेत. तर संपूर्ण परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours