मुंबई, 11 ऑक्टोबर : मीटू मोहिमेमुळं बॉलिवूडमध्ये वादळ आलं आहे. त्यावर आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान याने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा सिनेमा त्यानं सोडला आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने स्वतः याबाबत माहिती दिली.
ज्या व्यक्तीसोबत सिनेमा करणार होतो त्याच्यावरील लैंगिक छळाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळं या चित्रपटातून बाजूला होत असल्याचं आमिरनं म्हटलं आहे. कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करत असल्याचं आमिरनं सांगितलं आहे.
लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या एका दिग्दर्शकाच्या सिनेमातून आमिर खानने काढता पाय घेतला आहे. आमिर खानने त्याची पत्नी किरण राव आणि स्वतःच्या वतीने एक पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला दिग्दर्शक सुभाष कपूर याच्या 'मुगल' या आगामी सिनेमात आमिर काम करणार होता पण त्याने आता सिनेमा सोडला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours