औरंगाबाद, 11 ऑक्टोबर : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी बेताल वक्तव्य करत एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार एवढे वाढवले आहेत की ते वेडे झाले आहेत असं वादग्रस्त विधान दिवाकर रावतेंनी केलं आहे.
ज्यांच्या खांद्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याची भिस्त आहे, त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य केल्यानं वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत. औरंगाबाद येथे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी कर्मचा-यांच्या पगारवाढीबाबत वादग्रस्त विधान केलं.
तर पगारवाढीसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा कामबंद आंदोलन केलं आहे. भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे इथे अनेगदा पगारवाढीसाठी कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केलेली पगारवाढ एसटी कर्मचाऱ्यांची मान्य नव्हती.
हंगामी कर्मचारी म्हणून २५ टक्के पगारवाढ द्यावी, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. तसेच ही पगारवाढीची मागणी मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यावेळी देण्यात आला होता. त्यामुळे पगारवाढी जरी झाली असली तरी त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा संप पुकारल्यामुळे आणि त्यात आता परिवहन मंत्र्यांचं हे वक्तव्य यामुळे कर्मचाऱ्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
आधीच वेळेवर पगार वाढ होत नसल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळते. त्यात परिवहन मंत्र्यांच्या या व्यक्तव्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखं झालं आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर एसटी कर्मचारी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours