मुंबई, 26 नोव्हेंबर : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज(सोमवारी)10 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं एक मोठी घोषणा केली आहे. या हल्ल्याचे मास्टरमाईंड असणाऱ्या दहशतवाद्यांना पकडणाऱ्या व्यक्तीला 35 कोटींचं बक्षीस देण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
'लष्कर ए तोयबा' या दहशतवादी संघटनेच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील 10 ठिकाणी हल्ला केला. यामध्ये 166 निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. या दहशतवाद्यांच्या मास्टरमाईंडविषयी कोणत्याही प्रकारची माहिती देणाऱ्यास या बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.
'26/11 च्या हल्ल्याचा कट रचणाऱ्या हाफिज सईद आणि झकी उर रहमान लख्वी यांना पकडण्यास मदत करणाऱ्याला 35 कोटींचं बक्षिस देण्यात येईल ,' अशी माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी दिली आहे.
दरम्यान, मुंबईतील 26/11 हल्ल्याच्या वेळी 9 दहशतवादी मारले गेले तर अजमल कसाब हा जिवंत सापडला होता. नंतर त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार फाशी देण्यात आली. या हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत.
या हल्ल्यामुळे संपुर्ण देश हादरून गेला होता. दहशतवादी हल्ल्यात देशाने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी गमावले. या शहिदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मुंबईत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours